आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी बोलणे गरजेचे असते. आपले विचार आणि मत व्यक्त करण्यासाठी माणूस बोलत असतो. तसेच एकमेकांशी संवाद साधण्यासाठी बोलणे खूप गरजेचे असते. मात्र, काही व्यक्तींना खूप बडबड करण्याची सवय असते. अशी सवय त्या व्यक्तीसाठी हानिकारक ठरू शकते. ही सवय कशी असते आणि ती कशी कमी करावी याबद्दल जाणून घेवूयात.
जास्त चुका
एखादी छोटी गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा काहीजण लांबलचक कथा सांगत बसतात. तर काही जण विनाकारण भरमसाठ बडबड करत असतात. परंतु, जास्त बोलल्याने जास्त चुका होण्याची शक्यता असते. अति बोलण्याच्या सवयीमुळे जे बोलायला नको ते देखील माणूस बोलून जातो.
समजातील स्थान
यामुळे समोरची व्यक्ती कंटाळते. समजातील स्थान हरवून बसण्याची शक्यता असते. यासाठी कमीत कमी आणि योग्य बोलण्याची सवय करून घ्यावी.
हावभाव जाणून घ्या
बोलताना नेहमी समोरच्या व्यक्तीचे हावभाव पाहावेत. वायफळ, निरर्थक, असंबंध आणि विनाकारण बडबड करत असलेल्या व्यक्तीला बहुतांश लोक टाळण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तीच्या बोलण्यावर समोरची व्यक्ती प्रतिक्रिया देत नाही.
बोलण्याची संधी द्या
जास्त बोलण्याची सवय असणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला बोलू देत नसल्याने अशा व्यक्तीच्या जवळ कोणीच येण्याचे धाडस करत नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती त्याचे मत व्यक्त करत असताना मध्ये बोलणे टाळा.