एकटेपणामुळे बिघडू शकते शारीरीक आणि मानसिक आरोग्य

lonliness

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – कामानिमित्त अथवा अन्य कारणांमुळे अनेक लोक एकटे राहतात. एकटे राहिल्याने शांतता आणि त्रास देणारे कुणी नसल्याने कामात अडथळेही येत नाहीत. मात्र, एकटे राहण्याचे हे फायदे खूपच कमी आहेत. एकटे राहिल्याने होणारे तोटे जास्त त्रासदायक असू शकतात. कारण, एका संशोधनात असे आढळून आले आहे की, एकटेपणामुळे माणसाचे आरोग्य बिघडू शकते. एकटेपणामुळे तुमचे लो बीपीची शक्यता असते. यासाठी सोबत नातेवाईक असणे आवश्यक असते. एकटे रहावे लागत असल्यास मित्र किंवा नवीन लोकांशी संपर्क वाढवला पाहिजे, असे केल्याने एकटेपणामुळे होणारे धोके टाळता येऊ शकतात.

जुने मित्र किंवा नवीन लोकांची भेट घेतली नाही तर त्याचा व्यक्तीच्या स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. एकटेपणामुळे स्मरणशक्ती कमी होण्यास सुरूवात होते. तज्ज्ञांच्या मते मेंदूची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी सामाजिक संपर्क वाढवणे खूप आवश्यक आहे. वयोवृद्ध दांपत्यातील एकाचा मृत्यू झाल्यावर दुसरा जोडीदार तणावग्रस्त होण्याची शक्यता वाढते. अशावेळी मन रमण्यासाठी धार्मिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा. यामुळे मन:शांती मिळेल आणि मेंदूत सुरू असलेले विचारांचे वादळ शांत होण्यास मदत होईल, असे तज्ज्ञ सांगतात. एकटे राहणारी माणसे आपल्या आहाराकडेही योग्य लक्ष देत नाही. यामुळे अशक्तपणा वाढतो आणि ती व्यक्ती अधिक आजारी राहते.

एखाद्याशी न बोलणे किंवा संबंध न ठेवल्याने व्यक्तीमध्ये हीन भावना जागृत होते आणि त्याच्या आत्मविश्वासातही कमतरता येते. अशा पद्धतीने व्यक्तिमत्त्वाचे नुकसान होते. एकटेपणा दूर करण्यासाठी अनेकजण धूम्रपान व अल्कोहोल यासारख्या वाईट सवयींच्या आहारी जातात, परंतु असे करणे हृदयासाठी घातक आहे. मित्रांचा सहवास अशा वाईट सवयींपासून दूर ठेवण्यास साहाय्यक ठरू शकतो. तणाव आणि चिंता यासारखे मानसिक आजार एकटेपणामुळेच होतात. अशावेळी व्यक्ती नकारात्मक विचारांमध्ये गुरफटून जातो. तसेच अशा स्थितीतच व्यक्तीच्या वर्तनात बदल दिसून येतात. एकटेपणा लो बीपीची समस्या वाढवू शकतो. कारण त्याच्याजवळ बोलण्यासाठी कुणीच नसते. तज्ज्ञांच्या मते आतल्या आत घुटमळणे किंवा आपल्या भावना व्यक्त न करू शकण्याच्या स्थितीतच व्यक्तीला लो बीपीची समस्या भेडसावते.