आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दररोज धावपळीच्या जीवनामुळे आपण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर काहींची अशी तक्रार असते की दररोजच्या कामामुळे त्यांना वेळ नाही मिळत. तर अशा लोकांसाठी असे काही लहान लहान उपाय जाणून घेऊ ज्यामुळे तुम्ही निरोगी रहाल
सकाळी लवकर उठावे
सकाळी लवकर उठल्याने पूर्ण दिवस फ्रेश वाटतो. आणि दिवसाची सुरुवातही चांगली होते. त्यामुळे कोणत्याच कामात धावपळ होत नाही. सगळी कामे वेळेत पूर्ण होतात.
सकाळच्या किरणांची मजा घ्या
सूर्याच्या किरणांमुळे आपल्याला व्हिट्यामिन – डी मिळते. हे हाडांसाठी खूप गरजेचे असते. यामुळे सकाळी काही वेळ सूर्याच्या कोवळ्या किरणांची मजा घेतली पाहिजे.
सकाळचा नाष्टा करावा
नाष्टा केल्याने दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. आणि पोट भरल्या सारखे वाटल्याने अनहेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही. या नाष्टामुळे शरीराला योग्य प्रमाणात प्रोटीन आणि फायबर मिळते.
भरपूर पाणी प्यावे
पाणी शरीरासाठी उत्तम असते. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यास मदत होते. पाण्यामुळे शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते. यामुळे रोज दिवसातून २-३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे.
लवकर झोपावे
रात्री लवकर झोपणेही निरोगी राहण्यास मदत होते. लवकर झोपल्याने तुम्हाला पुरेशी झोप मिळते आणि सकाळी तुम्ही लवकर उठू शकता.