सकाळी झोपेतून उठताना ‘असे’ उठा, दिवस जाईल आनंदात

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दिवसाची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो. मात्र, दिवसाची सुरवात चांगल्या प्रकारे झाली नाही तर दिवसभर शाररिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, असे म्हटले जाते. कधी-कधी सकाळी उठल्यावर एखाद्या कारणामुळे मूड खराब होतो. अशाप्रकारे मूड बिघडल्याने मग संपूर्ण दिवस खराब जातो. जर एखादी व्यक्ती सकाळी झोपेतून उठताना हसत उठली तर ती व्यक्ती इतरांपेक्षा कमी तणावग्रस्त असते, असे एका संशोधनातून समोर आले आहे.

अंथरूणातून सावकाश उठा
काहीजण झोपेतून पटकन उठून बसतात ही सवय चांगली नाही. अंथरुणातून पटकन उठल्याने शरिरातील मांसपेशीना दुखापत होऊ शकते. रात्रभर शरीर कमी प्रमाणात हालचाली करत असल्याने सकाळी उठल्यानंतर सामान्य होण्यासाठी शरीराला थोडा वेळ लागतो. घाई-गडबडीत उठल्याने दिवस खराब होऊ शकतो.

चिडचिड करू नका
काही व्यक्तींना झोपेतून कुणी उठवले तर त्या रागावतात. अशा व्यक्तींना कुणी उठवल्यास तसर दिवसभर चिडचिड करतात.

कामाचे नियोजन नंतर करा
काहीजण झोपेतून उठल्याबरोबर दिवसभरातील कामांची यादी करतात, यामुळे दिवस खराब होऊ शकतो.

चहा, कॉफीऐवजी ज्यूस प्या
शरीर व्यवस्थित ठेवण्यासाठी पचन संस्था उत्तम असावी लागते. सकाळी उठल्यानंतर प्रथम चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असल्यास पचन संस्थेवर परिणाम होऊ शकतो. सकाळी ज्युस आणि पाण्याचे सेवन करावे.