अचानक गर्भपात झाल्यास महिलांनी अशी घ्यावी काळजी, ‘हे’ ६ उपाय करा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गर्भपात करणे हे महिलांना मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक ठरते. आकस्मिक गर्भपात झाल्यास किंवा केल्यास त्या शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील होतात. अशावेळी त्यांच्या आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते, असे तज्ज्ञ सांगतात. या काळात महिलांनी कोणती काळजी घ्यावी आणि कोणते घरगुती उपाय करावे याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

अशी घ्या काळजी

* आहारात भरपूर जीवनसत्त्वांचा समावेश करावा आणि भरपूर झोप घ्यावी.

* गर्भपातामुळे शरीर अत्यंत अशक्त झालेले असते. यामुळे कष्टाचे काम करू नये. सुमारे दोन आठवडे १५ पौंडांपेक्षा जास्त वजन उचलू नये, असे तज्ज्ञ सांगतात.

* आकस्मिक गर्भपात झाल्यानंतर शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी झाल्यावरच पुढच्या अपत्याच्या तयारीला लागावे.

* जास्तीत जास्त पेय पदार्थांचे सेवन करावे. अशक्तपणामुळे महिला पुरेसे जेवण जात नाही. पातळ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने शरीराला कमी मेहनत करावी लागते.

* या काळात महिलांनी काही दिवसांसाठी व्यायाम करण्याचे टाळावे. अशा स्थितीत कमीत कमी दोन आठवडे आराम करावा. तसेच नोकरदार महिलांनीही याकडे विशेष लक्ष द्यावे.

* डॉक्टरांनी सांगितलेल्या अँटिबायोटिक्सचे सेवन नियमित करावे.