थायरॉइडने त्रस्त आहात ? घरगुती उपाय करून समस्या सोडवा

tahiroid

आरोग्यनामा ऑनलाइन टीम  – आपल्या गळ्यातील थायरॉइडच्या ग्रंथी ह्या हार्मोन सक्रिय करून मेटाबॉलिझम कार्यप्रवण ठेवण्याचे मुख्य काम करतात. हा हार्मोन गरजेपेक्षा कमी वा अधिक सक्रिय झाल्यानंतर थायरॉइडशी निगडित समस्या निर्माण होतात. अशी समरूया निर्माण झाल्यास वजन वाढणे व अनिद्रा असे त्रास सुरू होतात. आहारात काही बदल करून या समस्येतून सुटका होऊ शकते. घरगुती उपाय करून ही समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.

हायपोथायरॉइडिझ ग्रस्त रूग्णांनी धूम्रपान, मद्यपान अशा व्यसनांपासून दूर राहावे. अशा रूग्णाने नेहमी संतुलित आहार घ्यावा. तसेच आहारात जीवनसत्त्व अ, ब व ई भरपूर असावे. ब्रोक्कली, पालक, मुगाच्या शेंगा व सोयाबीनचे सेवन केल्यास थायरॉइड ग्रंथीवर प्रतिकूल परिणाम होतो. थायरॉइडशी निगडित व्याधींनी पीडित असणारांनी या खाद्यपदार्थांपासून दूर राहायला हवे. थायरॉइड ग्रंथींची कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यासाठी जीवनसत्त्व ड अत्यावश्यक आहे. अंडी व दूध हा त्यासाठी चांगला स्रोत आहे. त्यासोबत उन्हाच्या संपर्कात येणेही अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे जीवनसत्त्व ड नैसर्गिकरीत्या मिळते.

हायपरथायरॉइडिझम अर्थात ज्यांच्या शरीरात थाइरॉइड हार्मोन अधिक बनते त्यांची हाडे व स्नायू दुर्बल होऊ लागतात. अशा वेळी त्यांना आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढवावे. या आजाराने पीडित व्यक्तीने दररोज १ हजार मिलिग्रॅम कॅल्शियमचा आहारात समावेश केला पहिजे. चीज, दही, ताक व पनीर अशा सर्व दुग्धजन्य पदार्थांत कॅल्शियम असते. अन्न शिजवण्यासाठी नेहमी आयोडिनयुक्त मिठाचाच वापर करावा. कारण त्याच्या कमतरतेमुळेच हा त्रास होतो.