आरोग्यनामा ऑनलाइन टीम : वैद्यकीय क्षेत्रात किचकट व अवघड शस्त्रक्रियांसाठी रोबोट्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पाश्चात्य देशांत हे प्रमाण जास्त आहे. हे रोबो किडनी शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील शस्त्रक्रिया, तसेच अन्य किचकट शस्त्रक्रिया अचूक करतात. मुत्राशयासंदर्भातील कॅन्सरच्या शस्त्रक्रियेला जवळपास चार तास लागतात, पण हीच शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने केली तर त्याला एक तासापेक्षाही कमी वेळ लागतो. तसेच ती जास्त अचूक होते. वैद्यकीय क्षेत्रात वापरले जाणारे रोबो कोणत्या प्रकारचे असतात, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत रोबोट्स
फार्मसी ऑटोमेशन
औषध निर्माण क्षेत्रात सुद्धा रोबोट्सचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो.
डिसइन्फेक्शन रोबोट्स
रूग्णांची खोली, रूग्णालये निर्जंतुक करण्यासाठी या रोबोट्सचा उपयोग केला जातो.
सर्जिकल रोबोट्स
हे रोबोट्स अचूकतेने ऑपरेशन्स करतात. डॉक्टर नसलेल्या ठिकाणी ते रिमोटच्या सहाय्याने काम करू शकतात.
रिहॅबिलिटेशन रोबोट्स
हे रोबोट्स रुग्णांची काळजी घेतात. अशक्त, अपंग व्यक्ती, वृद्ध यांची ते देखभाल करतात. त्यांची कामे, उपचार करतात.
टेलिप्रेझेन्स रोबोट्स
रिमोट ठिकाणी असलेल्या डॉक्टरांना मदत, त्यांच्याशी संवाद आणि त्यांना सहाय्य करण्याचे काम हे रोबोट्स करतात.
Visit : arogyanama.com