आरोग्यनाम ऑनलाइन टीम – Sleep | झोपण्याच्या पद्धतीचाही आरोग्यावर परिणाम होत असल्याने आपण कसे झोपतो (Sleep) हे महत्वाचे ठरते. आराम, मसल्समधील ताण आणि शरीरातील दुखण्यापासून आराम मिळण्यासाठी योग्य स्थितीत झोपले पाहिजे. चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळे अंगदुखीसह अन्य त्रास होऊ शकतो. झोपण्याच्या योग्य पद्धती जाणून घेवूयात.
1. पाठिवर झोपणे
ही सर्वात चांगली पद्धत आहे. यामुळे खांदेदुखी, कंबरदुखीपासून आराम मिळतो. मात्र, घोरण्याची सवय असल्यास ही सवय त्रासदायक ठरु शकते.
2. हात डोक्याखाली घेऊन
हात डोक्याखाली घेऊन झोपण्याची सवय फार चुकीची आहे. यामुहे हातांच्या नसा दबण्याची भीती असते.
3. पोटावर झोपणे
ही सवय धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे मानेला त्रास होतो. पाय आणि हात सुन्न होतात. नसांनाही त्रास होतो.
4. एका कुशीवर झोपणे
घोरण्याची सवय असणारे या स्थितीत झोपावे. परंतु, एकाच कुशीवर न झोपता थोड्या थोड्या वेळाने कुधी बदलली पाहिजे. अन्यथा अंगदुखी होऊ शकते.
Post-Covid Hair Fall | कोविड रिकव्हरीनंतर केस गळत आहेत का, मग करा हे 5 उपाय