आरोग्यानामा ऑनलाइन टीम – वेळी अवेळी जेवण करणे, कमी झोप, मसालेदार पदार्थांचे सतत सेवन करणे, दिवसभर एकाच जागी काम करणे, यामुळे कमी वयातच शरीर लठ्ठ होते. असा लठ्ठपणा घालवण्यासाठी काही सोपे उपाय असून ते केल्यास वजन कमी होऊ शकते. यातील प्रकार म्हणजे सायकलिंग होय. सायकलिंग केल्याने शरीरावर जमा झालेली चरबी कमी होते. वजन कमी होण्यास देखील मदत होते.
तसेच पोहण्यामुळे संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो आणि लवकर वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी ऐरोबिक्ससुद्धा खुप फायदेशिर आहे. एरोबिक्स केल्याने शरीरातील विविध भागात जमा झालेले फॅट कमी होण्यास मदत होते. टेनिस, बॅडमिंटन खेळल्याने मांड्यांवर जमा झालेले फॅट कमी होते.
पायांचा चांगला व्यायाम होतो. शिवाय डान्स केल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरींचा नाश होतो. फिरल्याने व पळाल्याने वजन कमी होते आणि तुम्ही तणावमुक्त राहण्यास मदत होते. यापैकी काही व्यायाम प्रकार नियमित केल्यास अगदी सहजपणे वजन कमी करता येऊ शकते. अथवा वजन योग्य प्रमाणात असल्यास ते नियंत्रणात ठेवण्यासाठी हे व्यायाम प्रकार खुप लाभदायक आहेत.