आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आरोग्याच्या लहान-लहान समस्या नेहमीच उद्भवत असतात. यासाठी डॉक्टरांकडे जाणेही योग्य नसते. काही घरगुती उपाय केल्याने या समस्या सहज दूर होतात. अशा छोट्या-छोट्या आरोग्य समस्यांवर काही रामबाण उपाय असून ते आपण जाणून घेणार आहोत.
हे उपाय आवश्य करा
* आम्लपित्त आणि अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी धने, जीरा आणि साखर तिन्हीही एकत्र करुन सेवन करा.
* रोज सकाळी लसणाच्या १-२ पाकळ्या न चावता सेवन केल्याने जॉइंट पेनमध्ये आराम मिळतो.
* डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी अमरवेलचा रस तयार करा आणि एक आठवडा नियमित डोक्याला लावा.
* जखम पिकली असेल तर धोतरा वनस्पतीच्या पानावर मोहोरीचे तेल लावा आणि ते पान जखमेवर लावा. जखम लवकर बरी होईल.
* संत्रीच्या सालांना वाळवून त्यांचे चुर्ण तयार करा. हे चुर्ण गुलाबजलमध्ये मिक्स करुन लावा. पिंपल्स आणि डाग दूर होतात.
* त्वचा कोरडी आणि निर्जीव झाली असेल तर ज्वारीचे पीठ, हळद, मोहरीचे तेल पाण्यात मिक्स करुन पेस्ट तयार करा. या पेस्टने नियमित शरीराची मालिश करा आणि कोमट पाण्याने अंघोळ करा. यासोबतच दूधात केसर टाकून सेवन करा, रुप उजळेल.
* संधीवाताची समस्या दूर करण्यासाठी एका दिवसात ८-९ केळी खावी. असे ३-४ दिवस करा, तुमची संधीवाताच्या वेदना कमी होतील.
* सकाळी उपाशापोटी व्हीट-ग्रासचा ज्यूस उपाशापोटी प्यायल्याने चेहरा चमकतो. रक्त स्वच्छ होते.
* खोबरेल तेलामध्ये लिंबूचा रस मिक्स करुन केसांना लावल्याने कोंडा आणि केसांचा कोरडेपणा दूर होतो.
* केसांतील कोंडा दूर करण्यासाठी मेथीच्या दाण्याची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट अर्धा तासासाठी केसांमध्ये लावा. केस धुवून घ्या आणि कॉटनच्या कापडाने केस कोरडे करा.