आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी ३० टक्के व्यायाम, ७० टक्के आहार आणि अन्य गोष्टी महत्त्वाच्या असतात. अन्य गोष्टींमध्ये चांगली जीवनशैली अंगीकारणे, योग्य झोप घेणे, बाहेरचे पदार्थ टाळणे, मानसिक ताण-तणाव टाळणे, धुम्रपान आणि मद्यपान टाळणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. वजन कमी करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी जाणून घेवूयात.
ही काळजी घ्या
* ८ तासांची झोप गरजेची
* रोज ६ ते ८ ग्लास पाणी प्यायल्याने कॅलरी इनटेक कमी होतो. वजन कमी होते.
* मैदा, शुगर यासारखे पदार्थटाळावेत.
* फायबर्स आणि प्रोटीन जास्त घ्या. कार्बोहाइड्रेट आणि फॅट कमी करा. ग्रीन व्हेजिटेबल्स, सॅलड जास्त खा.
* एका वेळी जास्त खाल्ल्याने मेटाबॉलिज्म स्लो होते. ३-४ तासांनी थोडे-थोडे खा.
* रात्री उशिरापर्यंत जागल्याने आणि योग्य झोप न घेतल्याने लठ्ठपणा वाढतो.