आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हाय ब्लड प्रेशर ही एक गंभीर समस्या असून ती नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. यासाठी खजूर अतिशय लाभदायक आहे. खजूर नियमित आणि योग्य प्रमाणात खाल्ल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहू शकते. शिवाय, नियमित व्यायाम करणे डॉक्टरांनी दिलेले औषधे नियमित घेणे जरूरी आहे. हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी नाष्ट्यामध्ये रोज ३ खजूर खावेत.
बदललेल्या जीवनशैलीमुळे अलिकडे ब्लड प्रेशरची समस्या तरूणांमध्येही दिसून येत आहे. हाय आणि लो ब्लड प्रेशर असे याचे दोन प्रकार आहेत. हाय ब्लड प्रेशर जास्त हानिकारक असते. नॉर्मल ब्लड प्रेशर १२० ते ८० असते. यापेक्षा वाढल्यास त्यास हाय ब्लड प्रेशर म्हणतात. हाय ब्लड प्रेशरमुळे हार्ट अटॅकही येऊ शकतो.
हे पदार्थ घ्या
* ३ खजूर
* १ ग्लास कोमट पाणी
असे खा खजूर
रोज सकाळी नाष्ट्यापूर्वी तीन खजूर खा. त्यावर लगेच गरम पाणी प्या. सतत एक महिना हा उपाय करा. एक महिन्यानंतरही हा उपाय सुरु ठेवू शकता.