योग्य वयात करा ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी

Breast cancer

आरोग्यनामा ऑनलाइन- ब्रेस्ट कॅन्सर हा आजार सध्या वेगाने वाढत आहे. भारतीय महिलांना हा आजार कमी वयातही होत असल्याचे दिसून आले आहे. अशा महिलांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. ब्रेस्ट कॅन्सर होण्याची विविध कारणे असून अनेकदा आनुवंशिक कारणही असते. यासाठी वेळीच काही तपासण्या केल्या पाहिजेत. भारतीय महिलांमध्ये हा आजार सरासरी वय ४५ ते ५० वर्षांत होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या वयात ब्रेस्ट कॅन्सरची तपासणी केली पाहिजे.

ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला ब्रेस्ट आणि अंडर आम्र्सच्या जवळपास गाठ तयार होते. ज्यामुळे प्रचंड वेदना होतात. ही गाठ दुखते तसेच जळजळही जाणवते. ब्रेस्टच्या आजूबाजूची त्वचा शरीराच्या इतर त्वचेपेक्षा वेगळी दिसते. स्तनांमध्ये थोडासा स्थूलपणा व त्वचा लालसर होते. ब्रेस्टमधून एक द्रव पदार्थ बाहेर येऊ लागतो

या आजारापासून बचाव करण्यासाठी काळी मिरी खुप गुणकारी आहे. काळ्या मिरीमध्ये मुबलक असलेले अ‍ॅन्टीऑक्सिडंट कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरसाठी फायदेशीर ठरते. तसेच टोमॅटोमध्ये अ‍ॅन्टीऑक्सिडंट असल्यामुळे हे इम्यून सिस्टम बूस्ट करतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई भरपूर असते. लसूण खाल्याने शरीरामध्ये कार्सिनोजेनिक कंपाउंड तयार होणे थांबते.

लसणामध्येही अ‍ॅन्टीऑक्सिडंट गुणधर्म असल्याने लसून यावर गुणकारी आहे. आल्याचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात. ग्रीन टी प्यायल्यानेही कॅन्सरच्या पेशी तयार होत नाहीत. मात्र, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणे आढळल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.