आरोग्यानामा ऑनलाईन टीम : काही महिलांना मासिक पाळीत खुप वेदना होतात. महिन्याचे ते चार दिवस त्यांच्यासाठी असह्य असतात. हा त्रास कमी करणे सहज शक्य आहे. मासिक पाळीत त्रास होत असलेल्या महिलांनी आपल्या आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास हा त्रास कमी होऊ शकतो.
हे पदार्थ सेवन करा
१ डाळिंबाचा रस मासिक पाळी येण्याच्या काही दिवस अगोदर प्यायल्यास फायदा होतो. यामुळे पाळी नियमित होते.
२ मासिक पाळी आल्यावर चॉकलेट खाल्याने शरीरात पाझिटिव्ह हार्मोन्स तयार होतात. शरीराचा थकवा निघून जाऊन शरीरात उर्जा तयार होते. चिडचिडही कमी होते.
३ मासिक पाळीत आहारात लसणाचा समावेश केल्यास तुमची त्वचा स्वच्छ राहते.
४ आहारात बीटचा समावेश केल्याने रक्तस्त्राव कमी होतो. थकवाही जाणवत नाही. शरीरात उर्जा तयार होते. रक्ताची पातळी पुर्ववत होते.
५ ब्लु बेरीज सेवन केल्याने मासिक पाळीच्या वेदनांची तीव्रता कमी होते. रक्तप्रवाह पातळ होतो.
Visit : arogyanama.com