आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकदा दिवसभर भरपूर काम केलेले असताना आणि खुप थकवा आलेला असतानाही रात्री शांत झोप लागत नाही (Sleep Side Effects). आपले मानसिक आणि शारीरीक आरोग्य चांगले राहण्यासाठी रात्री चांगली झोप लागणे महत्वाचे असते. परंतु, काही चुकांमुळे रात्री शांत झोप लागत नाही (Sleep Side Effects). यासाठी काही आवश्यक गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे. झोपण्याआधी कोणत्या चुका करू नये, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
1. रात्री झोपण्याआधी कामाविषयी विचार करु नका. यामुळे तणाव येतो आणि झोप लागत नाही.
2. झोपण्याआधी दारु पिऊ नका. यामुळे झोप येत नाही. सकाळी उठल्यावर त्रास होतो.
3. संध्याकाळनंतर कॉफी प्यायल्याने झोप उडू शकते.
4. झोपण्याआधी गोड पदार्थ खाऊ नका.
5. झोपण्याअगोदर स्पाइसी फूड खाणे टाळावे.
6. सकाळी फ्रेश होउन उठण्यासाठी जास्त वेळ टीव्ही पाहु नका.
7. झोपण्याआधी धुम्रपान केले तर चांगली झोप लागणार नाही.
High Blood Pressure | ‘या’ 7 लक्षणांमुळं ब्लड प्रेशर खुप हाय असल्याचं समजतं, एक्सपर्टने दिला इशारा
Cold-Flu | ताप-खोकल्यात तुमच्या आरोग्याचे शत्रू बनतात हे 10 हेल्दी फूड, रहा दूर