आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही पदार्थ असे असतात, जे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास त्रासदायक ठरू शकतात. तर योग्यपद्धतीने त्यांचे सेवन केल्यास आरोग्य चांगले राहू शकते. चांगल्या आरोग्यासाठी अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. परंतु, हे पदार्थ कधी सेवन करावेत, हे महत्वाचे असते. काही पदार्थ उपाशीपोटी खाल्ल्यास त्रास होऊ शकतो, हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे पदार्थ उपाशीपोटी टाळा
१) टोमॅटो
टोमॅटो कधीही उपाशी पोटी खाऊ नका. यात अॅसिडचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पोटाला त्रास होतो.
२) दारु
उपाशी पोटी दारुचे सेवन केल्यास अधिक त्रास होतो. पोटात जळजळ होते. अन्नाचे पचनही व्यवस्थित होत नाही.
३) दही
दही उपाशी पोटी ते खाणे शक्यतो टाळा.
४) लेमन सोडा
उपाशी पोटी लेमन सोडा पिणे टाळा कारण लेमन सोड्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असतं. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते.
५) केळे
केळे उपाशीपोटी खाल्ल्यास त्रास होण्याची शक्यता असते. शरिरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढून कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी अधिक होते. त्यामुळे शरीराला त्रास होतो.
६) कॉफी
कॉफीमध्ये कॅफीन असल्याने उपाशी पोटी प्यायल्यास त्याचा त्रास होतो.
७) मसालेदार पदार्थ
मसालेदार पदार्थांचे सेवन उपाशीपोटी करू नये. यामुळे पोटात अॅसिड तयार होऊन पोटदुखीचा त्रास सुरू होतो.