जेवल्यानंतर तात्काळ करु नका ‘ही’ कामे

file photo
आरोग्यनामा ऑनलाइन टीम: जेवल्यानंतर आपण काय करतो याकडे लक्ष देणे महत्वाचे ठरते. डायजेशन योग्य प्रकारे झाल्यास खाल्लेल्या पदार्थांचे संपुर्ण न्यूट्रिएंट्स शरीर एब्जॉर्ब करते. अनेक जण जेवणानंतर नकळत काही चूका करतात. यामुळे डायजेशनवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. जेवणानंतर कोणती कामे करु नये, याची माहिती असणे आवश्यक आहे.
जेवल्यानंतर या चूका करू नका
* जेवल्यानंतर लगेच झोपल्याने डायजेशन संथगतीने होते. जेवण योग्यप्रकारे डायजेस्ट न झाल्याने हार्टबर्न आणि गॅसची समस्या होऊ शकते.

* जेवणानंतर चहा प्यायल्याने प्रोटीन्सचे डायजेशन व्यवस्थित होत नाही. यामुळे इनडायजेशनची समस्या होऊ शकते.

* जास्त आंबट अथवा गोड खाल्ल्याने दातांचा इनेमलचा थर कमजोर होतो. अशावेळी ब्रश केल्याने इनेमल निघून जाते. ज्यामुळे दातांचे नुकसान होते.

* जेवणानंतर तात्काळ फळ खाल्ल्याने त्याचे डायजेशन व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे त्यातील पूर्ण पोषण तत्वे शरीराला मिळत नाहीत. यामुळे अ‍ॅसिडिटी आणि इनडायजेशन होऊ शकते.

* जेवणानंतर सिगारेट ओढल्यास त्याचा दहा टक्के वाईट परिणाम होतो. यामुळे हार्ट प्रॉब्लेम आणि ब्रीदिंग प्रॉब्लेम होऊ शकतात.

* आंघोळ केल्यानंतर बॉडी थंड होते. याचा प्रभाव ब्लड सक्र्युलेशनवर पडतो. यामुळे डायजेशन संथगतीने होते. जेवण योग्यप्रकारे पचन होत नाही आणि अ‍ॅसिडिटी व बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

* जेवणानंतर लगेच वॉक केल्यानंतर त्याचा प्रभाव ब्लड सक्र्युलेशनवर पडतो. यामुळे डायजेशन योग्य प्रकारे होत नाही. यामुळे अ‍ॅसिडिटी होते.

* जेवणानंतर पोटाला आराम देण्यासाठी लगेच बेल्ट लूज करणे अथवा काढल्याने त्याचा डायजेशनवर वाईट परिणाम होतो. इंटस्टाइन ब्लॉक होऊ शकतात.