आरोग्यनामा ऑनलाइन टीम – थ्रेडिंग केल्यानंतर अनेक वेळा रेडनेस, खाज आणि इरिटेशन होते. काही चुकांमुळे ही समस्या होऊ शकते. थ्रेडिंग केल्यानंतर कोणत्या चुका करु नयेत याविषयी जाणून घेवूयात.
मेकअप करु नका
अनेक वेळा आपण अगदी वेळेवर पार्लरमध्ये जातो आणि थ्रेडिंग करुन लगेच मेकअप करतो. परंतु हे चुकीचे आहे. थ्रेडिंग केल्याच्या ३-४ तासानंतर मेकअप करावा.
फ्रेग्नेंस प्रोडक्ट
थ्रेडिंगनंतर आयब्रोच्या आजुबाजूची स्किन कोरडी होते. यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही मॉश्चरायजरचा वापर करता. यामुळे कोरडेपणापासून तात्पुरता आराम मिळतो. परंतु यामुळे इरिटेशन आणि रेडनेस होते. थ्रेडिंग केल्यानंतर कमीत कमी १ दिवस या ठिकाणी फ्रेग्नेंस प्रोडक्ट लावू नका. तुम्ही एलोवेरा जेल अफ्लाय करु शकता.
गरम पाणी
आयब्रो करण्यापुर्वी हॉट शॉवर घेऊ शकता. यामुळे ब्रो हेयर सॉफ्ट होतील आणि थ्रेडिंग करणे सोपे होईल. परंतु हे केल्यानंतर कमीत कमी २ तास कोमट पाणी आणि स्टीमपासून दूर राहा.
त्वचेला हात लावू नका
आयब्रोजचा शेप चेक करण्यासाठी हात लावू नका. स्किन सेंस्टिटिव्ह झालेली असते. अशा वेळी टच केल्याने इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. एका लहान चुकीमुळे तुम्हाला समस्या निर्माण होऊ शकते. तुम्ही गुलाब जल किंवा एलोवेरा जेल लावू शकता.
उन्हात जाऊ नका
थ्रेडिंग केल्यानंतर लगेच उन्हात जाऊ नका. सेंस्टिटिव्ह स्किनवर प्रभाव पडू शकतो. यामुळे रेडनेस आणि जळजळ सारखी समस्या होऊ शकते. थ्रेडिंग केल्याच्या ३ तासानंतर बाहेर पडावे.