आरोग्यनामा ऑनलाईन – मानवी शरीरारातील जे अतिशय महत्वाचे भाग आहेत, त्यापैकी एक किडनी आहे. किडनीचे कार्य सुरळीत सुरू असल्यानेच आपले आरोग्य चांगले राहते. जर किडनीचे आरोग्य बिघडले तर त्याचा संपूर्ण शरीरावर अतिशय वाईट परिणाम दिसून येतो. यासाठी काही गोष्टींचे प्रमाण कमी केले पाहिजे अथवा त्या बंद केल्या पाहिजेत. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे आहेत ते पदार्थ
1 डिहायड्रेशन
किडनी निरोगी ठेवायची असेल तर भरपूर पाणी प्यावे.
2 पेनकिलर
पेनकिलरची सवय बंद करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
3 ओव्हर ट्रेनिंग
प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम केल्याने राब्डोमायोलॉसिस होऊ शकतो. यात वेगाने मसल्स टिश्यू कमजोर होऊ लागतात. रक्ताचे काही सब्सटेंस कमी होतात, किडनीचे नुकसान होते. किडनी फेलही होऊ शकते. म्हणून व्यायाम योग्यप्रमाणात करा.
4 जास्त प्रोटीन
जास्त प्रोटीनमुळे किडनीवर अतिरीक्त भार पडतो. अंडे, मासे, बीन्स, नट्स किती खावे याचा सल्ला घ्यावा.
5 मीठ
जास्त मीठ खाल्याने काही लोकांना ब्लड प्रेशरची समस्या होते. त्यामुळे किडनीचेही नुकसान होते. किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.
6 धुम्रपान
नियमीत धुम्रपान केल्याने केवळ उच्च रक्तदाबासह दोन्ही किडनीसाठी त्रासदायक आहे.
7 डाएट सोडा
रोज एक किंवा दोन डाएट सोडा प्यायल्याने किडनीचे आजार होऊ शकतात. हे टाळा