आरोग्यनामा ऑनलाईन –घरातील स्वयंपाक घरातच काही असे पदार्थ असतात जे वजन कमी करण्यासाठी मदत करतात. मात्र, आपण काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे वजन कमी करण्यासाठी इतरत्र उपायांचा आणि औषधांचा शोध घेत असतो. वजन वाढणे, ही समस्या सध्या खूपच वाढत चालली आहे.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम, डाएट असे अनेक उपाय अनेकजण करतात. परंतु, आपल्या स्वयंपाक घरात असे अनेक पदार्थ आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही आपले वजन नियंत्रणात ठेवून शकता. महिलांमध्ये काही असे हार्मन्स असतात, ज्यांच्यामुळे वजन कमी न होता वाढते.
या समस्येवर उपाय शोधण्यासाठी काही व्यक्ती बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतात. मात्र, ही उत्पादने वापरूनही वजन कमी होत नाही. वजन वाढण्याची विविध कारणे आहेत. त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे, जेवण्याच्या वेळा न पाळणे होय. तसेच भूक नसतानाही खाणे होय. यासंबंधीचे काही नियम आपण पाळले तर काही प्रमाणात वजन कमी करता येऊ शकते. तसेच आपण अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ आपल्या स्वयंपाकगृहातच उपलब्ध असता त्यापैकी एक म्हणजे मेथीचे दाणे होय.
वजन कमी करण्यासाठी मेथीचे जाणे फायदेशीर ठरतात. भूकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी किंवा भूक शांत करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर करता येतो. डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर आणि हाय कोलेस्ट्राँल यांसारखे आजार रोखण्यासाठी मेथीदाणे उपयोगी ठरतात. जीऱ्याचा वापर केल्यानेही वजन कमी होऊ शकते. जेवणाची चव वाढविण्यासाठी जिरे वापरले जाते. एक चमचा जीऱ्यामध्ये तीन पटींनी फॅट बर्न करण्याची क्षमता असते.
जीरे शरीरातील मेटाबॉलिज्म सिस्टम व्यवस्थित ठेवते. तसेच आलेदेखील वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आल्याचा वापर अनेक पेय पदार्थांमध्ये केला जातो. आल्यात फॅट बर्न फॉम्र्युला आहे. आलं ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. शरीराच्या वजनासोबतच पोटाची चरबीही आल्यामुळे कमी होते. स्वयंपाक घरातील आणखी एक असाच पदार्थ म्हणजे लसूण होय. लसूण शरीरामध्ये जमा झालेले फॅट्स कमी करतो. तसेच शरीराचे तापमान वाढवून फॅट कमी करण्याचा वेगही वाढवतो. शिवाय लसूण ब्लड प्रेशर, छातीतील जळजळ, हृदयरोग आजारांवर गुणकारी आहे.