आरोग्यानामा ऑनलाईन टीम : मधुमेहाच्या रूग्णांना आहाराच्या बाबतीत खुप काळजी घ्यावी लागते. कारण साखरेचे प्रमाण वाढवणारा पदार्थ खाण्यात आल्यास मधुमेह वाढू शकतो. काही पदार्थ असे असतात जे खाल्ल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येते. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे पदार्थ खा
१ दररोज दालचीनीचे सेवन करा. एक कप पाण्यामध्ये दालचीनी पावडर टाकून ते उकळवून घ्या आणि कोमट करून प्या.
२ फॅट फिश मध्ये ओमेगा ३ फॅट अॅसिड असते. याचे नियमित सेवन करा.
३ ब्लूबेरी सेवन करा. यामुळे इन्सुलिन आणि साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते.
४ हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा.
Visit : arogyanama.com