आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपल्याला कधी-कधी अचानक काहीतरी जखम होते. मग ज्या ठिकाणी जखम होते तिथे लाल होते. किंवा रक्त येते. यासाठी प्राथमिक उपचार म्हणून आपण आपल्या किचनधील काही वस्तूंच्या उपयोगाने झालेल्या जखमेवर तात्पुरता उपाय करू शकतो.
१) बर्फ : आपल्याला जर घरी काही काम करता करता भाजले तर त्यावर आपण बर्फ लावला. तर भाजलेल्या ठिकाणी होणारी आग कमी होते. त्यामुळे घरातील बर्फ हा आगेवर जालीम उपाय आहे.
२) मीठ : आपल्या शरीराच्या एखाद्या भागावर जर सूज आली असेल तर कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून सूज आलेल्या भागावर शेका. त्यामुळे सूज आणि लाल झालेल्या भागाला आराम मिळतो.
३) हळद : हळद ही शरीराच्या कोणत्याही भागावर झालेल्या जखमेवर किंवा सुजेवर जालीम उपाय करते. त्यामुळे झालेली जखम कोरडी होते. त्यामुळे किचन मधील हळद ही आरोग्याच्या अनेक समस्यांवर गुणकारी आहे.