आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बदललेली जीवनशैली, चुकीच्या सवयी, धावपळ, स्पर्धा यामुळे मनुष्य सतत तणावाखाली असतो. तणावामुळे अनेकांना विविध प्रकारचे आजारही होतात. याचे प्रमाण अलिकडे खुप वाढले आहे. तणावमुक्तीसाठी कोणते उपाय करावेत ते जाणून घेवूयात.
१ योगाभ्यास
तणावमुक्तीसाठी योगाभ्यास करणे उपयुक्त ठरते. सकारात्मकता वाढते.
२ हसणे
हसणे हा फार चांगला उपाय मानला जातो.
३ अॅक्यूप्रेशर थेरपी
या थेरपीमुळे शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. ही थेरपी फायदेशीर आहे.
४ म्युझिक थेरपी
या थेरपीमध्ये व्यक्तीच्या स्वभाव, समस्यानुसार संगीत ऐकवलं जातं. या थेरपीमुळे रुग्णाला मानसिक शांतता मिळते.
५ नॅचरोथेरपी
या थेरपीमध्ये रुग्णाला वेगवेगळ्या तेलांच्या आणि फुलांच्या सुगंधाच्या मदतीने तणावमुक्त केले जाते.
Visit : arogyanama.com