केवळ ‘याच’ लोकांना तोंडाचा कॅन्सर होतो ही चुकीची धारणा, जाणून घ्या कॅन्सरची लक्षणे !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सामान्यपणे असे पाहिले जाते ती, तोंडाचा कॅन्सर त्या लोकांना अधिक होतो. ज्यांची इम्यून सिस्टिम कमजोर असते. त्यासोबतच जे लोक चांगल्याप्रकारे तोंडाची स्वच्छता करत नाहीत आणि तोंडात होणाऱ्या समस्यांकडे लक्ष देत नाही. अशा लोकांना तोंडाचा कॅन्सर होतो. याकडे व्यक्तीने दुर्लक्ष करुन चालणार नाही. कॅन्सरचा सर्वात जास्त धोका तंबाखू किंवा त्यापासून तयार पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना होतो.
कॅन्सर म्हणजे कर्करोग याचे नाव एकताच लोकांच्या मनात भिती निर्माण होती. कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असू शकतात. भारतात तोंडाच्या कॅन्सरचे अनेक रुग्ण आढळतात. याचे कारण भारतीतल लोक अनेक पदार्थाचे व्यसन करतात. यामध्ये गुटखा, तंबाखू, पान मसाला इ. पण सर्वांनी हे जाणून घेतले पाहिजे की, तोंडाचा कॅन्सर हा केवळ पान मसाला, गुटखा खाणाऱ्यांनाच होतो, असे नाही. तोंडाचा कॅन्सर कोणात्याही व्यक्तीला होऊ शकतो. कॅन्सरचा धोका कोणाला अधिक असतो. आणि काय आहेत तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे जाणून घ्या सविस्तर…….
१ कॅन्सरच्या सुरुवातील तोडांच्या आत पांढरी-लाल पुरळ किंवा छोट्या जखमा होतात. याकडे लक्ष दिले नाही तर पुढे तोंडाचा कॅन्सर होऊ शकतो.
२ तोंडाची जखम असणे, सूज येणे, लाळेतून रक्त येणे, जळजळ होणे, तोंडात दुखणे आदी गोष्टी कॅन्सरचा इशारा देतात.
३ तोंडाची दुर्गंधी येणे, आवाजात बदल होणे, काही गिळण्यास त्रास होणे इत्यादी तोंडाची सामन्य लक्षणे आहे. तोंडाचा कॅन्सर तोंडामध्ये कुठेही होऊ शकतो.
४ तोंडाच्या आत कुठेही गाठ आढळल्यास तोंडाचा कॅन्सर संकेत असतो. त्यासोबतच तोंडात कोणतेही रंग परिवर्तन झाले असेल तर वेळीच तपासणी करणे गरजेचे आहे.
#कॅन्सरचा धोका टाळण्यास कोणती काळजी घ्याल…………………
दात व तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता करावी.
१ जंक फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेट चे पदार्थ कमी खावेत. तसेच फळे खावीत.
२ तोंडात कोणत्याही प्रकारचा बदल दिसत असेल किंवा तोंडाला असलेली समस्या दूर होत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
३ तोंडाच्या कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर धुम्रपान, गुटखा, तंबाखू आणि नशेची सवय वेळीच सोडा.
४ तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने कार्सिनोमा प्रकारचा कर्करोग आहे. हा जीभ, ओठ, हिरड्या, टाळू किंवा गालांच्या आतील बादुत होतो. गुटखा सिगारेट व तत्सम पदार्थांमधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.