• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home फिटनेस गुरु

‘या’ पदार्थांमुळं वाढतोय किडनी स्टोनचा धोका, 6 गोष्टींचं सेवन टाळा, जाणून घ्या

by Sajada
January 1, 2021
in फिटनेस गुरु, माझं आराेग्य
0
kidney stone

kidney stone

2.4k
VIEWS

आरोग्यनामा ऑनलाईन- किडनी स्टोनमुळे(kidney stone) वेदना असह्य होतात. जेव्हा मीठ आणि शरीरातील इतर खनिजे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा स्टोन तयार होण्याचा धोका वाढतो. त्याचा आकार कधीही निश्चित नसतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या वेबसाईडवर याबाबत माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या म्हण्यानुसार, आपण जे काही खातो पितो यावर स्टोनची स्थिती अवलंबून असते. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोन(kidney stone) होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती सांगणार आहोत.

कोल्ड-ड्रिंक्स पासून दूर राहाः स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींना डॉक्टर जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण कोल्ड-ड्रिंक्सचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यात केमिकल्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे स्टोनचा त्रास वाढू शकतो.

व्हिटामीन सी-ः रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी लोक आता व्हिटॅमिन सी किंवा लिंबूवर्गीय फळांकडे अधिकाधिक आकर्षित होऊ लागले आहेत. कदाचित आपण विसरत आहात की जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी देखील स्टोनची समस्या निर्माण करू शकते. तसेच बाजारात उपलब्ध असलेल्या केमिकल्सयुक्त फळांच्या रसाचे सेवन नुकसानकराक ठरू शकते.

ऑक्सलेट असलेल्या वस्तू कमी खाः स्टोनच्या बाबतीत डॉक्टर प्रथम ऑक्सलेट न खाण्याचा सल्ला देतात. पालक, काही धान्य, क्रॅनबेरी, रताळे आणि चॉकलेट इत्यादींमध्ये ऑक्सलेट जास्त प्रमाणात आढळते. काही लोक टोमॅटो खाणे टाळा. पण टोमॅटोमध्ये फारच कमी प्रमाणात ऑक्सलेट आढळते.

जास्त सोडियमः जर तुमच्या अन्नात भरपूर सोडियम असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. जंक फूड, पॅक फूड आणि जास्त प्रमाणात मीठ खाणे टाळावे. बाहेरचे चिप्स, सूप, स्नॅक्स यांमध्ये जास्त प्रमाणात मीठाचा वापर केला जातो. म्हणून पॅकबंद पदार्थ खाऊ नका.

अ‍ॅनिमल प्रोटीनः प्राण्यांमधील प्रोटीन्स शरीरात कॅल्शियम ऑक्सलेट, कॅल्शियम फॉस्फेट आणि यूरिक एसिड स्टोनचा धोका वाढवते. म्हणून, आपण आपल्या अन्नामध्ये प्राण्यांकडून मिळणारे प्रथिने कमी ठेवले पाहिजे. मांस, मासे ऐवजी दूध आणि चीजऐवजी शेंगदाणे, मसूर किंवा सोयाबीन पदार्थांपासून प्रोटिन्स मिळवणे हा एक चांगला पर्याय मानला जातो.

डीटॉक्सिफिकेशन आवश्यकः मूत्रपिंडाला नैसर्गिक मार्गाने डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी प्या. याशिवाय स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आवळा, डाळिंब आणि सफरचंदांचे व्हिनेगर यासारख्या गोष्टी फायदेशीर ठरतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट प्लॅन घेऊन खाण्या पिण्यात पोषक पदार्थांचा समावेश करा.

 

 

टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.

 

Tags: 'किडनी स्टोन'kidney stoneप्रोटीनव्हिटामीन सी
heart-attack
तज्ज्ञांचं मार्गदर्शन

हृदयविकार आणि ‘कार्डिअ‍ॅक अ‍ॅरेस्ट’मध्ये ‘हा’ फरक, जाणून घ्या ६ कारणे

November 29, 2019
sleep
माझं आराेग्य

आरोग्यासाठी झोपण्याची स्थितीही ठरते महत्वाची

September 28, 2019
Heart attack
माझं आराेग्य

‘या’ ६ संकेतावरून समजू शकते…हृदयविकाराचा झटका येतोय, जाणून घ्या

November 16, 2019
home-redimens
माझं आराेग्य

‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब! आवश्य करून पहा

September 18, 2019

Most Popular

stomach

‘तुम्ही पण पोटावर झोपता ? आतापासूनच सोडा ही सवय’, अन्यथा…

7 hours ago
pregnancy test

आता घरच्या घरी अशी करा प्रेग्नेंसी टेस्ट, जाणून घ्या योग्य पद्धत

7 hours ago
Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.