‘अपेंडिक्स’ आजाराचे असू शकतात ‘हे’ ८ संकेत, याकडे करु नका दुर्लक्ष

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अपेंडिक्स लहान आणि मोड्या आतड्यामध्ये असतो. यामध्ये बॅक्टेरिया जमा झाल्याने इन्फेक्शन, बध्दकोष्ठता किंवा आतड्यांच्या समस्येमुळे यामध्ये सूज किंवा अन्य आजार होतात. याला एपिंडिसायटिससुध्दा म्हटले जाते. अपेंडिक्सच्या आजाराचे ८ संकेत असून ते आपण जाणून घेणार आहोत.

पोटदुखी 
पोटाच्या उजव्या भागात बेंबीच्या खाली अथवा आजूबाजूला तीव्र वेदना होतात. अपेंडिक्सच्या जागेवर हात लावला तरी दुखते.

पोट फुगणे
पोटातील इन्फेक्शनमुळे गॅसची समस्या होते आणि पोट फुगते.

भूक कमी लागणे
पोटात वेदना होतात. भूक कमी होते आणि काहीच खाण्याची इच्छा होत नाही.

जीभेवर पांढरा थर जमा होतो
पोट खराब झाल्यामुळे जीभेवर पांढरा थर जमा होतो आणि तोंडाची दुर्गंधी येते.

डायरिया
पोटात इन्फेक्शन झाल्याने पचनक्रिया योग्य प्रकारे होऊ शकत नाही आणि लुज मोशनची समस्या होते.

उलटी
अपेंडिक्स झाल्यावर पोटात वेदना होतात आणि उलटी आल्यासारखे वाटते

ताप
पोटात इन्फेक्शन झाल्याने ताप येतो. पोटदुखीसोबत तापसुद्धा वाढू शकतो.

बद्धकोष्ठता
डायजेशन व्यवस्थित न झाल्यामुळे कधी-कधी बद्धकोष्ठतेचा त्रासही होऊ शकतो.