आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शिलाजीत हे आयुर्वेदीक औषध पौरुषत्व वाढवणारे आहे. हे रक्त शुद्ध करुन रक्ताभिसरण चांगले करते. शिलाजीत हे अनेक आजारांवर उपयोगी आहे. शिलाजीतमध्ये ८५ प्रकारचे मिनरल्स असतात. हिमालय, तिब्बत आणि गिलगिट क्षेत्रातील खास डोंगरांमध्ये ते मिळते. हे चिकट, काळ्या-भुरक्या रंगाचे असते. मात्र, काही आजारात शिलाजीत सेवन करू नये, असे तज्ज्ञ सांगतात. हे आजार कोणते, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
यांनी सेवन करू नये
१ गरोदर महिला
२ अॅलर्जीचा त्रास असणारे रूग्ण
३ संधीवाताचे रूग्ण