• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 13, 2019
in Food, माझं आराेग्य
0
उपाशीपोटी ‘ही’ ४ फळे खा, नेहमी राहाल निरोगी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : आरोग्यासाठी फळे खाणे चांगले असते हे डॉक्टर नेहमीच सांगतात. आयुर्वेदात तर काही फळांना खूपच महत्व आहे.या फळांचा शरीराला योग्य आणि जास्त उपयोग करून घ्यायचा असेल तर ती योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने खाल्ली पाहिजेत.अम्लीय फळांचे सेवन जर सकाळच्या वेळी उपाशीपोटी केले तर ते शरीरामध्ये जाऊन क्षारीय होतात. उपाशीपोटी फळे खाल्ल्याने हृदय आणि पचनाशी संबंधित अनेक आजारदेखील दूर होतात,असे एका संशोधनात म्हटले आहे.

संत्री अम्लीय फळ असून ते शरीरात जाऊन क्षारीय होते. सकाळी उपाशीपोटी आणि दिवसातून चार संत्र्यांचे सेवन केल्याने कोलेस्टरॉल कमी होतो. मूत्रपिंड आणि मुतखड्याची समस्याही दूर होते. तसेच सफरचंदात अँटीऑक्सिडंट्स घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी राहतो. उपाशीपोटी दररोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरामध्ये कँसरचा धोकाही कमी राहतो.

शिवाय किवी या फळात भरपूर पोषक द्रव्ये असतात. किवीमध्ये संत्र्याच्या तुलनेत दुप्पट व्हिटॅमिन सी आढळते. पोटॅशियम, मॅग्निशियम, फायबर आणि व्हिटॅमिन ईचाही हे फळ चांगला स्रोत आहे. उपाशीपोटी नियमित हे खाल्ल्यास अधिक फायदा मिळतो. तर पपईमध्ये कॅरोटिन मोठ्या प्रमाणात आढळून येते. हा घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. उपाशीपोटी पपईचे सेवन केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. याच्या सेवनाने पोटाशी संबंधित रोग दूर होतात. यामुळे ही फळे नियमित सेवनात असल्यास अनेक रोग दूर राहतात.

Tags: ApplesarogyanamaFruithealthkiwiorangeआजारआरोग्यआरोग्यनामाकिवीपपईसंत्रीसफरचंद
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021