स्वच्छतागृहात फोन घेऊन जाणे
कामाच्या ठिकाणी मित्रांशी वा ग्राहकांशी फोनवर बोलत स्वच्छतागृहात जाण्याची सवय असल्यास ते टाळा. तेथील किटाणू तुमच्या डेस्कपर्यंत पोहचतात.
डोळ्यांना सतत हात लावणे
काम करताना डोळे, चेहरा यांना सारखे हात लावणे टाळावे. त्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो. डोळ्यांना चोळल्यास त्या बाजूची त्वचा संवेदनशील असल्याने नुकसान होते.
एकाच ठिकाणी बसणे
एकच खुर्चीवर खिळून बसण्याशिवाय काहींना पर्याय नसतो. मात्र, अधूनमधून उठून फेरफटका मारला पाहिजे. दर तासाला एक चक्कर मारावी. एकाच ठिकाणी बसल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात.
पाणी कमी पिणे
अनेकजण काम करताना चहा कॉफी घेतात. परंतु, पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते. आरोग्याच्या तक्रारी वाढतात.
घाईत घरातून निघाल्याने नाष्टा केला जात नाही. सतत असे होत राहिले तर आरोग्य बिघडते. न्याहारी व्यवस्थित झाली तर चयापचय क्रिया निरोगी राहते. शरीरात ऊर्जा शक्ती निर्माण होते.
पायांना अढी घालून बसणे
आराम म्हणून काहीजण पायांना अढी घालून बसतात. मात्र, अधिक काळ असे बसल्यास कंबर वा मानेचे दुखणे होऊ शकते. रक्तदाबही वाढतो.
वाकून बसणे
खुर्चीत वाकून बसल्याने कंबर, मानदुखीचा त्रास होऊ शकतो. खुर्चीत ताठ बसावे. गरज भासल्यास छोटी कुशन पाठीसाठी वापरा.