जाणून घ्या, ‘या’ ६ आजारात काय खावे आणि काय खाऊ नये, असे पाळा पथ्य
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणत्याही आजारात पथ्य हे खूप महत्वाचे असते. पथ्य पाळले नाही तर अनेकदा औषधांचाही परिणाम दिसून येत नाही. तसेच आजारही बळावतो. यासाठी पथ्य खूप महत्वाचे असते. म्हणून आजारपणामध्ये सर्वात जास्त लक्ष आहाराकडे देण्याची आवश्यकता असते. कोणत्या आजारपणात काय खाऊ नये आणि काय खावे याविषयीची माहिती आपण घेवूयात.
उलटी
उलटी, मळमळ होत असल्यास काहीही खाण्याची इच्छा होत नाही. परंतु, उलटी होत असल्यास पोट रिकामे ठेवणे योग्य नाही. उलटीमध्ये तेलकट पदार्थ, कॉफी, अल्कोहल, थंडपेय घेऊ नयेत.
डोकेदुखी
शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास डोकेदुखी होते. यामुळे सतत थोडे थोडे पाणी पिणे डोकेदुखीमध्ये लाभदायक ठरते. डोके दुखत असल्यात कृत्रिम मिठाई, मीट, चॉकलेट, सुकामेवा खावू नये.
सर्दी
सर्दीमध्ये अद्रकाचा चहा घ्यावा. स्पायसी आहारापासून दूरच राहावे. सर्दीमध्ये मद्यप्राशन करू नये.
पोट खराब
पोट खराब झाल्यास मसालेदार म्हणजे तिखट पदार्थ खाऊ नयेत. काही परिस्थितींमध्ये तिखट खाल्ले जाऊ शकते, परंतु पोट खराब झाल्याच्या स्थितीमध्ये यापासून दूर राहावे. पोट खराब झाल्यानंतर तिखट खाणे या धोकादायक ठरू शकते.
थ्रोट इन्फेक्शन
गळ्यात इन्फेक्शन झाले असेल तर कोणतेही कठीण पदार्थ खाऊ नयेत. थ्रोट इन्फेक्शन झाल्यानंतर नरम, क्रिमी पदार्थ खावेत. परंतु गरम पेय, चिप्स, शेंगदाणे, कच्च्या भाज्या, फळे खावू नयेत.
वेदना
ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, वेदनेमध्ये त्यांचे सेवन करणे चांगले आहे. मसल्समध्ये वेदना असतील तर कॉफी आणि अल्कोहलपासून दूर राहावे.
Comments are closed.