आरोग्यनामा ऑनलाईन टीम – बाळंतपणानंतर महिलांनी आपली काळजी घेतली पाहिजे. कारण या काळातसुद्धा बाळ त्यांच्यावर आवलंबून असते. याकाळात त्यांनी योग्य आहार घेतला, तर बाळाचे पोषण योग्यप्रकारे होते. स्तनपानातून बाळाला सर्व पोषकतत्व मिळू शकतात. यासाठी बाळंतिणीने कोणते पदार्थ खावेत, याविषयी आपण माहिती घेवूयात.
हे पदार्थ खावेत –
भाज्यांचे सूप
यातील आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियममुळे दूध तयार होण्याची प्रक्रिया वाढते.
तूप
यातील गुड फॅट्स, फायबर्समुळे बाळाची वाढ चांगली होते. बाळ आणि आईला पोटाच्या समस्या होत नाही.
दही
यातील कॅल्शियम, आयर्न, मिनरल्समुळे बाळाची वाढ चांगली होते.
बदाम
यातील अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्सने कमजोरी दूर होते. बाळ आणि आईला उर्जा मिळते.
डाळ
यातील फायबर्स, कार्बोहायड्रेट्सने उर्जा मिळते. बाळ तरतरीत होते.
लसूण
यातील अँटिऑक्सिडंट्स आईला इन्फेक्शनपासून दूर ठेवतात. दूध तयार होण्याची क्रियाही वाढते.
अंडे
यातील प्रोटीन, व्हिटॅमिन-डी मुळे बाळाची वाढ योग्य प्रकारे होते.
पनीर
यातील कॅल्शियम, व्हिटॅमिन-बी, प्रोटीनमुळे बाळाची हाडे मजबूत होतात.
पालक
यातील फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन्समुळे बाळाच्या मेंदूची योग्य वाढ होते.
राजमा
यातील प्रोटीन, आयर्नमुळे मातेला रक्ताची कमतरता भासत नाही.