आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बदललेल्या जीवनशैलीमुळे अलिकडे हाय ब्लड प्रेशरची समस्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात या समस्येने अनेक लोक ग्रस्त आहेत. काही घरगुती उपाय केल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घेवूयात.
हे पदार्थ नियमित खा
१ आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. पोटॅशियम अधिक असलेल्या भाज्यांचं सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते.
२ केळीमध्ये पोटॅशियम अधिक असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे दररोज एकतरी केळे खा.
३ ब्लूबेरीमध्ये फ्लेवनॉयड्स हा घटक असल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. त्यामुळे ब्लूबेरी, स्टॉबेरी खावे.
४ बीटमध्ये नायटड्ढीक ऑक्साईड असल्याने हाय ब्लड प्रेशर कमी होते.
५ रोज लसूण खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो.
Visit : arogyanama.com