आरोग्यानामा ऑनलाइन टीम : धावपळीच्या या जगात प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे टेन्शन हे असतेच. अनेकदा सर्वप्रकारची काळजी घेत असताना एखादा छोटासा आजार आपल्या पाठीमागे लागतो, परंतु, त्याचे कारण समजत नाही. परंतु, असे अनेक आजार आहेत जे केवळ मानसिक ताणतणावामुळे होतात. यामुळे अशा आजारांवर टेन्शनमुक्त होण्याचा उपचार करा. मात्र, अशा आजारांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. मानसिक तणावामुळे कोणती लक्षणे आजाराच्या स्वरूपात दिसतात, याविषयी जाणून घेवूयात.
ही आहेत लक्षणे
१ अंगाला अचानक खाज येत असेल, अस्वस्थ वाढत असेल, तर हा स्किन प्रॉब्लेम नसून टेन्शनचे लक्षण असू शकते.
२ पोटदुखी होणे हे सुद्धा याचेच लक्षण आहे. टेन्शन कमी केल्यास ही पोटदुखी थांबू शकते.
३ अचानक चेहऱ्यावर डाग येणे, पुरळ, फोड येणे, हे सुद्धा सततच्या टेन्शनचे लक्षण असू शकते.
४ अचानक हिरड्यांतून रक्त येणे, हे सुद्धा याचेच लक्षण आहे. तुम्ही खुपच तणावात असल्याचा हिरड्यांनी दिलेला हा संकेत असू शकते.
५ अचानक गोड किंवा जंकफूड खाण्याची इच्छा होणे, सारखी भूक लागणे, असे टेन्शनमुळे होऊ शकते.
Visit : arogyanama.com