आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही आजार हे महिलांमध्ये खुपच कमी प्रमाणात दिसून येतात. तर पुरूषांमध्ये या आजारांचे प्रमाण खुपच जास्त असते. महिलांच्या तुलनेत पुरूषांना जास्त प्रमाणात होणारे हे आजार हे त्यांच्या जीवनशैलीमुळे होत असतात. हे सहा आजार कोणते याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
लिव्हर डॅमेज – पुरूषांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्यात लिव्हर डॅमेज होण्याची समस्या जास्त दिसून येते.
फुप्फुसांचा कँसर – सिगारेट, तंबाखू ही व्यसने पुरूष जास्त प्रमाणात करत असल्याने त्यांना फुप्फुसांचा कँसर होण्याचा धोका असतो.
किडनीचे आजार – जास्त दारू पिल्यानेही पुरूषांना किडनीचे आजार होण्याचा धोका अधिक असतो.
तोंडाचा कँसर – तंबाखू, सिगरेट आणि दारू या व्यसनांमुळे पुरूषांना तोंडाचा कँसर होण्याची जास्त शक्यता असते.
हार्ट अटॅक – पुरूष हे महिलांपेक्षा अधिक तणावात राहत असल्याने रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत राहत नाही. यामुळे त्यांना हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो.
एड्स – महिलांपेक्षा पुरूष अधिक शारीरिक संबंध ठेवतात. त्यामुळे त्यांना एड्स होण्याचा धोकाही जास्त असतो.