आरोग्यानामा ऑनलाईन टीम : गुळ हा अँटी टॉक्सीन आहे. याच्या सेवनाने शरीरातील हानिकारक टॉक्सीन टाकले जातात. गुळ अनेक आजारावर गुणकारी औषध आहे. तसेच सौंदर्यवृद्धीसाठी सुद्धा गुळ लाभदायक आहे. सौंदर्य प्रसाधनांवर वारेमाप खर्च करण्याऐवजी जर गुळाचा वापर केला जास्त फायदा होऊ शकतो. गुळाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ नियमित गुळ सेवन केल्याने त्वचेची सफाई होते.
२ रोज थोडा थोडा गुळ खाल्ला तर पिंपल्सची समस्या दूर होऊ शकते.
३ जेवण केल्यानंतर थोडा गुळ खाल्ल्यास गॅस आणि पचनाशी संबंधीत समस्याही दूर होते.
४ गुळामध्ये अँटी अॅलर्जिक तत्व असल्याने दम्याच्या रूग्णाला आराम मिळतो. शरीरातील तापमानही नियंत्रीत राहते.
५ पाच ग्रॅम गुळात तेवढेच सरसोचे तेल मिसळून खाल्ल्याने श्वसनाशी निगडीत समस्या दूर होऊ शकते.
६ घसा बसला असल्या गुळ खावा. यासाठी शिजलेल्या भातासोबत गुळाचे सेवन करावे.
७ कान दुखत असल्यास गुळात तुप मिसळून खावे.
८ यात आयर्न असल्याने सकाळी पाण्यासोबत गुळ सेवन केल्यास अॅनिमियाचा त्रास दूर होऊ शकतो.
९ थकवा जाणवत असल्यास थोडा गुळ पाण्यासोबत घेतल्यास आराम मिळतो.
Visit : arogyanama.com