वेळीच सावध राहा ‘ही’ असू शकतात कॅन्सरची लक्षणं
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – कॅन्सर एक प्राणघातक रोग आहे आणि पेशींच्या अनियंत्रित वृद्धीमुळे तो होत असतो. कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसून येत आहे. तोंडाचा, पोटाचा, गर्भाशयाचा, स्तनाचा, त्वचेचा, फुफ्फूस व स्वादूपिंडाचा असे अनेक प्रकार यामध्ये आहेत. त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. मुख्यत: केसांची त्वचा, चेहरा, ओठ, कान, मान, छाती, हात व पाय या अवयवांच्या त्वचेवर हा विकार होण्याची शक्यता अधिक असते.
जाणून घ्या स्किन कॅन्सरची लक्षणं –
शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. सर्व प्रथम तो एका मोल्सच्या रुपात आढळतो मात्र नंतर त्यांचे गंभीर कर्करोगामध्ये रुपांतर होते.
जर तुम्हाला उन्हामध्ये गेल्याने सतत खाज येत असेल तर हेदेखील स्किन कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
मान, कपाळ, गाल आणि डोळ्यांच्या आसपास अचानक जळजळ होऊ लागते.
जर तुमच्या त्वचेवर अचानक डाग आले असतील आणि ते चार किंवा पाच आठवड्यांपेक्षा जास्त दिवस हे डाग दिसत असतील तर हे अत्यंत घातक ठरू शकतं. त्यामुळे त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा.
स्किनमध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येतात. जसं तुमच्या शरीरावर अनेक बर्थमार्क असतील आणि त्यांचा आकार वाढू लागला किंवा खाज येत असेल तर स्किन कॅन्सर असू शकतो.
तुमच्या त्वचेवर तीळ आहे आणि त्याचा अचानक शेप आणि रंग बदलला किंवा त्याच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलला तर डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.
चेहऱ्यावरील पिंपल्सचा आकार वाढत असेल आणि त्याचा रंगही बदलत असेल तर स्किन कॅन्सर असू शकतो.
एक्जिमा म्हणजेच खाज येणं. हेदेखील स्किन कॅन्सरचं लक्षणं आहे. जर ही समस्या कोपर, हात किंवा गुडघ्यांवर दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्षं करू नका. डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्या.
स्किन कॅन्सर होऊ नये म्हणून ही काळजी घ्या –
भरपूर पाणी प्या, ज्यामुळे स्किन कॅन्सर होण्याचा धोका वाढत नाही.
घराबाहेर पडताना शरीरावर थेट सूर्यकिरणं पडणार नाहीत याची काळजी घ्या.
त्वचेवर लोशन, मॉयश्चरायझर इत्यादींचा वापर करा.
त्वचेवर अचानक डाग दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.