आरोग्यनामा ऑनलाईन टीम – त्वचेच्या पेशी जेव्हा असामान्य पद्धतीने विकसित होतात, त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होतो. शरीराचे जे अवयव सूर्यकिरणांच्या थेट संपर्कात येतात, तेथील त्वचेवर स्किन कॅन्सर होण्याचा धोका अधिक असतो. केसांची त्वचा, चेहरा, ओठ, कान, मान, छाती, हात व महिलांचे पाय या अवयवांच्या त्वचेला कॅन्सर होण्याची शक्यता असते. मेलनोमा हा त्वचेचा कर्करोग गडद रंगाची त्वचा असणाऱ्या लोकांमध्ये अधिक आढळतो. प्रथम तो एका मोल्सच्या रुपात असतो. नंतर त्याचे गंभीर कर्करोगामध्ये रुपांतर होते. पुरुषांना शक्यतो डोके व मान या अवयवांवर तर स्त्रियांना पायाच्या खालच्या भागावर हा आजार होतो. कधी कधी या रोगाचा प्रभाव हातपायांच्या नखांवर स्तनांवर, काखेत सुद्धा होऊ शकतो.
अनेकदा त्वचेवरील लक्षणं ही स्किन कॅन्सरची असल्याची समजत नाही. ही लक्षणं आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे. कारण स्किन कॅन्सर जीवघेणाही ठरू शकतो. स्किन कॅन्सरची प्रमुख लक्षणं म्हणजे मान, कपाळ, गाल आणि डोळ्यांच्या आसपास अचानक जळजळ होते. त्वचेवर अचानक डाग आले आणि ते बरेच दिवस तसेच राहिले तर हे स्किन कॅन्सरचे लक्षण असू शकते. चार किंवा पाच आठवड्यांपेक्षा जास्त दिवस हे डाग राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. स्किन कॅन्सर झाल्यास त्वचेत अनेक प्रकारचे बदल घडतात. अनेकदा शरीरावरील बर्थमार्कचा आकार वाढू लागतो. अथवा त्यास खाज येत. त्वचेवर तीळाचा आकार आणि रंग अचानक बदलला किंवा त्याच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग बदलला तर ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. तसेच चेहऱ्यावरील पिंपल्सचा आकार वाढत असेल आणि त्याचा रंगही बदलत असेल तर स्किन कॅन्सर होण्याती शक्यता असते. एक्जिमा म्हणजेच खाज येणे हेदेखील स्किन कॅन्सरचे लक्षणे आहे. कोपर, हात किंवा गुडघ्यांवर असा त्रास होत असेल तर त्वरित डॉक्टरांता सल्ला घ्या. हा आजार टाळण्यासाठी घराबाहेर पडताना शरीरावर थेट सूर्यकिरणे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्वचेवर अचानक डाग दिसू लागल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भरपूर पाणी प्यायल्या स्किन कॅन्सर होण्याचा धोका वाढत नाही. बाहेर जाताना त्वचेवर लोशन, मॉयश्चरायझर लावावे.