आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चेह-यावरील सर्वात सुंदर भाग म्हणजे ओठ. परंतु जर ओठ काळे असतील तर आकर्षक चेहराही सुंदर दिसत नाही. प्रत्येकालाच आपले ओठ हे सुंदर असावेत असे वाटत असते. ओठांच्या बाबतीत विशेषतः महिला वर्ग अधिक सजग असतो. ओठ चांगले दिसण्यासाठी महिला लीप ग्लॉस, लीप बाम आणि लिपस्टिक यांसारख्या कॉस्मॅटिक्सचा अक्षरशः भडीमार करतात. मात्र कॉस्मॅटिक्सच्या अतिवापरामुळे ओठ काळे आणि ड्राय पडू लागतात. काही घरगुती उपाय वापरून ओठ गुलाबी आणि सुंदर बनवता येतात. विशेष म्हणजे घरगुती उपायांनी कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ओठही गुलाबी होतील. त्यासाठी खालील टिप्स फॉलो करा –
लिंबू आणि मध –
लिंबाच्या प्राकृतिक गुणधर्मांमुळे ओठांवरील काळे डाग दूर होतात. १ चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबूचा रस यांचं मिश्रण ओठांवर लावा. लिंबामुळे ओठांवरील काळसरपणा दूर होईल आणि मधामुळे ओठ कोमल आणि सुंदर होतील.
काळे मिरे –
काळ्या मि-याची पूड पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट जवळपास पाच ते दहा मिनिटे ओठांवर लावून ठेवा. त्यानंतर ओठ पाण्याने धुवून टाका.
गुलाबाच्या पाकळ्या –
गुलाबाच्या पाकळ्या रात्रभर दूधात भिजत ठेवाव्यात आणि सकाळी उठल्यावर त्या ओठांवर लावाव्यात. सुकल्यानंतर ओठ धुवावेत. गुलाबाच्या पाकळ्यांच्या नियमित वापराने ओठ गुलाबी आणि चमकदार बनतात.
बीट –
बीटचा एक तुकडा घेऊन ओठांवर रगडा किंवा बीटचा रस एक तासभर ओठांवर लावून ठेवा. एक तासानंतर ओठ स्वच्छ धुवून घ्या. या उपायने ओठ हळूहळू गुलाबी होऊ लागतील.
बदामाचे तेल –
दररोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना बदामाचे तेल लावून झोपा. बदामचे तेल लावल्याने ओठांचा काळेपणा हळूहळू दूर होईल.
ग्लिसरीन –
ग्लिसरीन आणि लिंबू एकत्रित करून ओठांना लावल्यास ओठांचा काळेपणा दूर होतो. ग्लिसरीनमुळे ओठ जास्त काळ मुलायम राहतात.