आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लग्न करणे आरोग्यासाठी चांगले असते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. हाय कोलेस्टेरॉलमुळे ह्रदयविकारासारखी समस्या असेल तर लग्न केल्याने ही समस्या दूर होऊ शकते. तसेच लग्न करण्याचे अजूनही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हे आहेत ५ फायदे
१) एक प्रेम करणारा पार्टनर आरोग्याची काळजी खूप चांगल्यापद्धतीने घेण्यासाठी प्रेरित करीत असतो. यामुळे आयुष्य वाढण्यास मदत होते.
२) लग्न केल्याने ह्रदय विकाराचा धोका कमी होतो त्यामुळेही आयुष्य वाढते, असे ऐस्टन मेडिकल स्कूलचे डॉक्टर पॉल कार्टर आणि त्यांच्या टीमने म्हटले आहे.
३) हाय कोलेस्टेरॉल आणि हाय ब्लड प्रेशरने त्रस्त असणाराने लग्न केल्यास ही रिस्क कमी हो
४) हाय कोलेस्टेरॉल असलेल्या ५०, ६० आणि ७० च्या वयातील महिला आणि पुरुषांपेक्षा लग्न झालेल्यांची जीवंत राहण्याची शक्यता सुमारे १६ टक्के जास्त असते.
५) लग्न केल्याने आयुष्यात ज्यांना जास्त रिस्क आहे, त्यांनाही फायता होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)