आरोग्यानामा ऑनलाइन टीम – किडनी हा शरीरातील अतिशय महत्वाचा भाग आहे. जर किडनीचे आरोग्य बिघडले तर अनेक समस्या निर्माण होतात. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी किडनीचे कार्य अतिशय महत्वाचे असते. चुकीचा आहार आणि सवयींमुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते. सध्या किडनीच्या रूग्णांची संख्या सतत वाढत आहे. किडनी खराब होऊ नये म्हणून कोणते पदार्थ टाळले पाहिजेत याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे पदार्थ टाळा
१. लाल मांस
लाल मांसमध्ये मोठ्याप्रमाणात प्रोटीन्स असतात. हे मांसपेशींसाठी चांगले असले तरी किडनीसाठी अतिशय धोकादायक ठरू शकतात. तसेच यात मोठ्याप्रमाणात फॅट असल्याने ते किडनीसाठी चांगले नाही. याच्या जास्त सेवनाने शरीरात युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते.
२. अल्कोहल
जास्त मद्य म्हणजेच अल्कोहल सेवन केल्यास किडनी खराब होऊ शकते. यामुळे किडनीचे कार्यच बदलून जाते. याचा परिणाम मेंदूवर सुद्धा होऊ शकतो. अल्कोहलमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. शरीरासाठी तसेच किडनीसाठी पाण्याची अतिशय आवश्यकता असते. थोडे जरी अल्कोहल घेतले असेल तर भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे.
३. मीठ
सोडियम हा घटक आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवतो. पोटॅशियमसह सोडियम हे दोन घटक एकत्रितपणे शरीरातील रक्त किडनीच्या सहाय्याने शुद्ध करण्याची प्रक्रिया करत असतात. परंतु, जेव्हा आहारात जास्त मीठ घेतल्यास रक्त पातळ करण्यासाठी किडनीला आणखी पाण्याची गरज भासते. यामुळे रक्तदाबाला धोका निर्माण होतो.
४. कॅफीन
कॉफीत मोठ्याप्रमाणात कॅफीन असते. सकाळी ताजेतवाने होण्यासाठी अनेकजण कॉफी घेतात. परंतु, कॉफिन जास्त प्रमाणात घेतल्यास रक्तदाबाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे किडनीलाही धोका निर्माण होतो.
५. सोडा आणि एनर्जी डिड्ढंक
सोडा आणि एनर्जी डिड्ढंक आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामध्ये कॅफिन आणि साखरेसह रासायनिक घटक असतात.
६. आर्टिफिशियल स्वीटनर्स
आर्टिफिशियल स्वीटनर्स वापर डाइट सोडामध्ये केला जातो. साखरेला पर्याय म्हणून याचा वापर केला जातो. परंतु, संशोधनानुसार आर्टिफिशियल स्वीटनर्स हे साखरेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उलट यात साखरेप्रमाणेच काही घटक असतात.
७. डेअरी प्रॉडक्ट
डेअरी प्रॉडक्टमध्ये कॅल्शियम आणि अन्य पोषकतत्व भरपूर प्रमाणात असतात. हे आरोग्यासाठी आवश्यक असले तरी याचे जास्त प्रमाणात सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. यातील कॅल्शियमच्या जास्त प्रमाणामुळे किडनी स्टोनची समस्या होऊ शकते. ज्यांना किडनीचे आजार आहेत, त्यांनी डेअर प्रॉडक्टपासून दूर रहावे.
८. डबाबंद पदार्थ
डबाबंद पदार्थ शरीरासाठी विषासमान असतात. या पदार्थांमध्ये पेस्टीसाइड्सचा वापर केला जातो. जे किडनीसाठी धोकादायक असते.