आरोग्यनामा ऑनलाईन टीम – महिलांच्या आयुष्यात मासिक पाळीमुळे अनेक समस्या येत असतात. मासिक पाळीच्या दिवसात त्यांना अधिक त्रास सहन करावा लागतो. तर कधी मासिक पाळीमार्फत अधिक स्त्राव झाल्याने शरीरात रक्ताची कमतरता येते. एवढा त्रास सहन करत या महिला मासिक पाळीच्या त्रासातून जात असतात. पण मासिक पाळी आलीच नाही तर त्यांच्यासाठी दुसरी डोकेदुखी ठरते. किंवा वेळेवर जरी आली नाही तरी त्यांना आधीपेक्षा जास्त त्रास होऊ शकतो.
त्यामुळे मासिक पाळी नियमित आणण्यासाठी काय उपाय करावेत हे अधिकाधिक मुलींना माहित नसते. त्यांच्यासाठी ही माहिती.
1. आलं
आपण आपल्या आहारात आल्याचा वापर करतोच. पण हेच आलं आपल्याला अनियमित मासिक पाळी आणण्यासाठी खुप मदत करते. आधी आल्याचे बारीक ठेचून ते पाण्यात उकळून घ्या, त्यानंतर त्यात एक चमचा साखर टाका. हे मिश्रण घेतल्याने अनियमितता आणि मासिक पाळीत होणारा त्रास दुर होऊ शकतो.
2. तिळ आणि गुळाचा लाडू
तिळ आणि गुळ समान मात्रेत घेऊन एकत्रितपणे त्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. तसच मासिक पाळी नियमित येण्यास मदत होते. त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात तिळ आणि गुळाचे लाडू खाणे शरीरासाठी लाभदायक असते.
3. कच्ची पपई
कच्ची पपईचा ज्यूस या दिवसात पिणे चांगले असते. हा ज्यूस पिल्याने मासिक पाळीचे चक्र नियमित होते. तसंच त्या दिवसात होणारा त्रास ही कमी होतो.
4. दालचीनी
घरातील मसाल्याच्या डब्यात असणारी दालचीनीही मासिक पाळीसाठी गुणकारी असते. एक ग्लास दूधात अर्धा चमचा दालचीनीची पूड टाकून हे मिश्रण सलग ६ आठवडे घेतल्याने मासिक पाळीचे चक्र नियमित होते. तसंच शरीराचे स्वास्थ्यही चांगले राहते.
5.हळद
अनियमित मासिक पाळीचे चक्र नियमित करण्यासाठी हळदही अधिक गुणकारी आहे. एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद टाकून किमान एक महिना नियमितपणे घतले, तर अनियमित मासिक पाळीचा त्रास दुर होतो.