आरोग्यानामा ऑनलाईन टीम : बदललेली जीवनशैली, सतत कामाचा ताण, धावपळ, स्पर्धा आदि कारणांमुळे मानसिक ताण वाढण्याची समस्या होऊ शकते. या समस्येकडे वळीच लक्ष दिले नाही तर पुढे गंभीर परिणाम होऊ शकतात. या तणावाचे कधीही डिप्रेशनमध्ये रूपांतर होऊ शकते. यासाठी सतर्क राहण्याची, योग्य ती काळजी घेण्याची गरज असते. ताण कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय प्रभावी ठरू शकतात. तसेच आहारात काही विशेष पदार्थांचा समावेश केल्यास ताण कमी होऊ शकतो.
हे पदार्थ नियमित खा
१ चिकन सूप
चिकन सूप स्ट्रेस कमी करण्याचा उत्तम पर्याय आहे. यामुळे थकवा, तणाव दूर होतो. शरिराला उर्जा मिळते. यामध्ये भरपूर कॅलरी असतात.
२ डार्क चॉकलेट
चॉकलेटमुळे मानसिक स्वास्थ चांगले राहते. ब्लड प्रेशर नॉर्मल आणि डोकं शांत राहते. उर्जा वाढते.
३ सुकामेवा
सुकामेवा खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते. थकवा, ताण कमी होतो.
४ ब्लूबेरी
थकवा, ताण दूर होतो. ब्लड प्रेशर नियंत्रीत ठेवण्याचे काम करते.
५ ओट्स
मेंदूला चालना मिळण्यास मदत होते. मेंदूला चालना मिळते. ब्रेन स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.
Visit : arogyanama.com