आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आले म्हणजेच अद्रकमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. पावसाळ्यातील व्हायरल इन्फेक्शनमध्ये आल्याचे घरगुती उपाय केले जातात. तसेच आले टाकलेला चहा उर्जा देतो. मात्र, अनेक आजारांवर गुणकारी असलेले आले काही लोकांना हानिकारकही ठरू शकते. अशा लोकांनी आले खाणे टाळले पाहिजे.
१ गर्भवती महिला
गर्भवती महिलांनी शेवटच्या ३ महिन्यांमध्ये अद्रक खाणे टाळावे. कारण त्यामुळे प्रीमॅच्युअर डिलीव्हरी आणि लेबर होण्याचा धोका वाढतो.
२ नियमित औषधे घेणे
डायबिटीज आणि हाय बीपीची नियमित औषधे घेत असल्यास अद्रक खाणे टाळावे. कारण या औषधींमधील बेटा-ब्लॉकर्स, अँटीकोगुलँट्स आणि इंसूलिनसोबत अद्रक मिसळल्यास धोकादायक मिश्रण तयार होते.
३ कमी वजन
वजन कमी करण्यासाठी अद्रकचा विशेष वापर केला जातो. मात्र ज्यांचे वजन कमी आहे, त्यांची भुक आणखी कमी होईल. यामुळे त्यांनी अद्रक खाणे टाळावे.
४ रक्तविकार
कोणताही रक्त विकार असल्यास अद्रक कमी खावे. हिमोफीलिया पिडीत व्यक्तींनी खावू नये. अद्रकामुळे रक्त पातळ होते व थोड्या जखमेनेही खूप रक्त वाहते.