आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गोड पदार्थ खाण्याचा मोह कधी-कधी आवरता येत नाही. परंतु जास्त गोड पदार्थ खाणे शरीरासाठी हितकारक नसते. यामुळे असे काही पर्यायी पदार्थ आहे, जे खाल्ल्यामुळे गोड चव मिळते आणि साखरेमुळे होणारे नुकसानही टाळता येते. असे कोणते पदार्थ आहेत, ज्यामुळे गोड खाण्याचा आनंद मिळू शकतो, याची माहिती आपण जाणून घेवूयात.
* बार्ली मार्ट अँक्स्ट्रोक्ट हे सातूपासून तयार होते. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. गडद रंग असणारे हे सायरप शिऱ्याप्रमाणे असते. याच्यामुळे कोणत्याही पदार्थाला एक वेगळी चव मिळते.
* शुकेनट हा साखरेला नैसर्गिक रूपात सादर करणारा ऊस असतो. सेंद्रिय उसापासून हे तयार केले जाते. यामुळे साखरेची गरज पडत नाही.
* मोसंबीमध्ये अनेक औषधी तत्त्वे असतात. अधिक गोड असेल तर ते साखरेला योग्य पर्याय ठरते.
* कोकोनट शुगर ही नारळाच्या फुलामध्ये नैसर्गिक पद्धतीने तयार होते. ही साखर बाजारात क्युब, पेस्ट आणि दाणेदार स्वरूपात मिळते. यात भरपूर पोटॅशियम असल्याने हाडे मजबूत होतात.
* ब्राऊन राइस सिरप हे ब्राऊन राइसपासून मिळते. इतर आहाराच्या तुलनेत हे अधिक पौष्टिक असते. बेक्ड ब्रेडमध्ये याचा वापर केला जातो.
* स्टॅव्हिया म्हणजेच मधुपत्र या झाडाची पाने साखरेपेक्षाही अधिक गोड असतात. ओटमिलच्या एका बाऊलमध्ये केवळ दोन थेंब रस टाकला तरी गोड चव मिळते.
* अँरिथ्रोटॉल हे शुगर अल्कोहोल असते. यामुळे दातही खराब होत नाहीत. पण हे साखरेएवढे गोडही नसते. ब्राऊनीजसारख्या चॉकलेट बेक्ड पदार्थांमध्ये वापरता येते.
* पेंडखजूरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. तसेच ग्लायसेमिकचे प्रमाण कमी असते.
* केळी कोणत्याही पदार्थातून खाल्ल्यास साखरेची गरज भासत नाही.
* अँप्रिकॉटची प्युरी हे व्हिटॅमिन ए आणि सी बरोबरच फायबर आणि आयर्न असणारे अत्यंत पोषक फळ आहे. योगर्टबरोबरही वापरता येते.
* अॅगेव्ह नेक्टर म्हणजेच रामबाण अमृतचा अनेक वर्षांपासून ईश्वरी वरदान म्हणून वापर केला जात आहे. याची चव मधाप्रमाणे असते. गरम चहा किंवा आइस टीमध्येही याचा वापर करता येतो. हेही कमी प्रमाणातच घ्यावे. फ्रक्टोसचे प्रमाण जास्त असल्याने अधिक घेतल्यास शरीरासाठी अपायकारक ठरू शकते.
* मेपल सिरप हे थेट रोपापासून मिळवले जाते. त्यात ५० अँटिऑक्सिडंट्स असतात. सुकामेवा, मध आणि खांडसरीबरोबरही वापरता येते.
* मधात औषधी तत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. गरम पाणी, चहाबरोबर घेता येते. सॅलेडवर टाकूनही खाता येते. लिंबू-मध घेतल्याने पचनक्रिया चांगली राहते.
* अॅपल सॉस हे ओटमिलच्या कुकीजमध्ये एक वाटी साखर टाकण्याऐवजी टाकता येऊ शकते. हे नैसर्गिक स्वीटनर आहे. ते घरीही तयार करता येऊ शकते.
* दालचिनीचा सकाळचा चहा किंवा कॉफीमध्ये वापर करावा. त्यामुळे एक वेगळी चव मिळेल. रोगप्रतिकारक क्षमताही वाढते. कॅलरीज मात्र वाढणार नाहीत.
* द्राक्षाचा ज्यूस हा व्हिटॅमिन सीची दररोजची गरज पूर्ण करण्यासाठी साखरेला चांगला पर्याय आहे. ते टॉनिकप्रमाणे काम करते. सोड्याबरोबरही घेता येते.
* क्रॅनबेरीचा एक वाटी साखरेऐवजी वापर केल्यास शरीरामध्ये अँटिऑक्सिडंट्सच्या प्रमाणामध्ये वाढ होते.
* मनुका साखरेला पर्याय म्हणून वापरता येऊ शकतात. यामुळे पदार्थाला एक वेगळी चवही मिळते. तसेच अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरचे भरपूर प्रमाण असलेला आहारही मिळतो.
* कोको पावडर गरम पाणी किंवा दुधामध्ये टाका. साखरेची कमतरता पूर्ण करण्याबरोबरच यामुळे ताजेपणाही मिळतो.
* फ्रोजन ज्यूस कॉन्स्ट्रेटमध्ये अतिरिक्त फायबर आणि अँटिऑक्सिडंटही असते. कोणत्याही चांगल्या मिठाईमध्ये वापर केल्यास साखरेची गरज भासत नाही.