आरोग्यनामा ऑनलाइन – शारीरिक संबंधाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक संबंध एक कम्प्लिट एक्सरसाइज आहे. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, मूड चांगला राहतो, पार्टनरसोबत चांगले बॉंडिंग होते, वेदनांपासून सुटका मिळते, असे अनेक फायदे आहेत. शरीरिक संबंधाच्या फायद्यांबाबत नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात तर असे आढळून आले की, नियमित शारीरिक संबंध ठेवल्याने स्मरणशक्तीत वाढ होते.
ज्या महिला नियमित शारीरिक संबंध ठेवतात त्यांची स्मरणशक्ती चांगली रहात असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ७८ महिलांनी या संशोधनात सहभाग घेतला होता. या महिलांचे वय १८ ते २९ दरम्यान होते. त्यांना काही शब्द आणि चेहरे आठवण्यासाठी सांगण्यात आले. या संशोधनातून असे स्पष्ट झाले की, नियमित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांनी जास्त शब्द लक्षात ठेवले होते. शारीरिक संबंधांमुळे हिप्पोकँपसच्या चारही बाजूने टिश्यूजची वाढ होते. हिप्पोकँपस हा मेंदूचा भाग असून त्याचा संबंध मेमरी फंक्शनसोबत असतो.
शारीरिक संबंध आणि हिप्पोकँपस यांचा थेट संबंध आहे. या संशोधनात सहभागी झालेल्या ज्या महिला नियमित शारीरिक संबंध ठेवत होत्या त्यांनी अनेक शब्द लक्षात ठेवले. मात्र या संशोधनातून असेही समोर आले की, यात सहभाग घेणारे केवळ शब्दच लक्षात ठेवू शकले. चेहरा लक्षात ठेवू शकले नाहीत. कारण हिप्पोकँपस प्रत्येक प्रकारच्या स्मरणशक्तीसाठी जबाबदार नसतो, असे हे संशोधन करणारे संशोधक म्हणतात.