आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पुरूषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर होण्याची कारणे अजूनही पूर्णपणे स्पष्ट नाहीत. वृद्धावस्था, आनुवंशिकता, लठ्ठपणा प्रोस्टेट कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. प्रोस्टेट ग्रंथी ही मूत्राशयाच्या खालच्या भागात असते. वीर्यनिर्मितीचे हे तिचे मुख्य कार्य आहे. वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीच्या आकारमानात वाढ होत जाते. ज्यास बिनाइन प्रोस्टेटिक हायपरप्लासिया म्हणतात. प्रोस्टेट कॅन्सरमध्ये प्रोस्टेट ग्रंथीच्या पेशीमधील गुणसूत्रांमध्ये बिघाड होऊन पेशीची अनियंत्रित वाढ होते. या वाढीतून निर्माण होणार्या गाठीला प्रोस्टेट कॅन्सर म्हणतात.
ही आहेत लक्षणे
1 वारंवार लघवीला होणे
2 लघवीची धार खूप बारीक असणे
3 लघवी मध्येच थांबणे
4 लघवीला जोर लावावा लागणे
5 लघवीतून रक्त जाणे
6 पाठ, खुब्यामध्ये दुखणे
7 काही पुरुषांमध्ये लक्षणे दिसत नाहीत.
अशी घ्या काळजी
जास्त प्रमाणात फळे व पालेभाज्या खा. विटामिन व खनिजयुक्त आहार घ्या. नियमित व्यायाम आणि योगा करा.