आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सध्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्टफोन दिसून येतो. अगदी शाळकरी मुलांनाही पालक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून स्मार्टफोन वापरण्यास देतात. तरूणाई तर स्मार्ट फोनमध्ये इतकी रममाण झालेली असते की त्यांना आजूबाजूचे कसलेच भान नसते. परंतु, स्मार्टफोनच्या अतिवापराने वेगवेगळे विकार उद्भवत आहेत. यामुळे शरीरावर अनेक विपरित परिणाम दिसून येतात. यापैकी एक आजार म्हणजे सेल्फाइटिस होय.
मेंटल डिसऑर्डर
अनेक जण सतत सेल्फी काढत असतात. त्यांना ही सवयच जडलेली असते. सेल्फी काढण्याची ही सवय धोकादायक ठरु शकते. यासंदर्भात अमेरिकन तज्ज्ञांनी म्हटले आहे की, सतत सेल्फी काढण्याची सवय हा मेंटल डिसऑर्डरचा प्रकार (मनोविकार) आहे. यास सेल्फाइटिस असे म्हटले जाते.
तरूणांमध्ये जास्त प्रमाण
तरुणाईमध्ये हा प्रकार जास्त आढळून येतो. शहरी भागात सेल्फीचा हा विकार मोठ्याप्रमाणात दिसून येतो. यामध्ये तरुणींचा समावेश सुमारे ६० टक्के आहे. सेल्फीची ही सवय तरूणाईसाठी धोकादायक ठरु शकते.