बागेचं सौंदर्य वाढवणाऱ्या ‘या’ ७ वनस्पती देतात ‘डासां’ पासून मुक्ती, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळ्यात डासांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होतो. डास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यांसारख्या जिवघेण्या आजारांचे वाहकही असतात. त्यामुळे डासांच्या प्रादुर्भावापासून दूर  राहण्यासाठी उपाय केले पाहिजेत.  नैसर्गिकरित्या डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी बागेत ‘मॉस्किटो रेपेलेन्ट प्लांट्स’ लावा.

जर तुम्हाला वाटत असेल की, घराभोवती असलेल्या  झाडा-झुडपांमुळे डासांचे प्रमाण  वाढत  आहे तर हा चुकीचा समज आहे.  घराभोवती योग्य झाडे  लावल्यास डासांपासुन तुमचे रक्षण होण्यास नक्कीच मदत होईल.  ही मॉस्किटो रेपेलेन्ट प्लांट्स केवळ डासांपासून सुटका करत नाही तर बगिच्याचेही सौंदर्य वाढवतात.

नैसर्गिकरित्या डासांपासून रक्षण करणाऱ्या वनस्पती (मॉस्किटो रेपेलेन्ट प्लांट्स)

तुळस,


पुदिना,



गवतीचहा,


झेंडू ,


लव्हेंडर ,

Image result for लव्हेंडर ,

पेपरमींट

Image result for पेपरमींट

रोजमेरी

Image result for रोजमेरी 

डासांना पळवून लावण्यासाठी  घरगुती उपाय

लव्हेंडरचा सुगंध खूप उग्र  असतो त्यामुळे  डास तिथे फिरकत नाहीत. म्हणून घरात लव्हेंडर पासून बनवलेला   रुम फ्रेशनर वापरा.

लिंबाचे आणि निलगिरीचे तेल सम प्रमाणात मिक्स करुन शरीरावर लावा.

खोबरेल तेल व कडूलिंबाचे तेल समान प्रमाणात एकत्र करा आणि अंगाला लावा.

घरातील दारं-खिडक्या बंद करून कापुर  जाळा व त्याचा धूर १५-२० मिनिटे घरात राहू द्या.