आरोग्यनामा ऑनलाईन टीम : फुलांमध्ये ही नैसर्गिक जादू आहे. या जादूचा उपयोग आपण करून घ्यायलाच हवा. अनेक प्रकारची फुले असतात. तसेच त्यांचा सुगंधदेखील खुप मनमोहक असतो. ही फुले केवळ देवाला अर्पण करण्यासाठी, शोभेसाठी आणि सुवास घेण्यासाठीच असतात, असा आपला समज आहे. मात्र, तो चुकीचा असून सुगंधी फुलांच्या तेलाने नियमित मसाज केल्यास विविध आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. हे फायदे कोणते याची माहिती आपण घेणार आहोत.
हे आहेत फायदे
१ शरीर-मन प्रफुल्लित होते. आपण एका नव्याच विश्वात जातो.
२ फुलांचा मनावर आणि शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
३ शरीर तजेलदार होते.
४ अनेक प्रकारच्या विकारांपासून दिलासा मिळतो.
५ त्वचेच्या समस्यांपासून सुटका होते.
६ फुलांचा सुगंध उत्तम वेदनाशामक आणि टेन्शनमुक्त करणारा असतो.
७ शरीर सुदृढ होते. उत्साहदेखील खूप वाढतो.
८ चिंता दूर होऊन नवचैतन्य संचारते.
Visit : arogyanama.com