आरोग्यनामा ऑनलाईन टीम : सुरूवातीला कमी असणारा थंडीचा कडाका हळूहळू वाढत जाणार आहे. त्यामुळे येथून पुढे शरीराची काळजी घेणे खुप गरजेचे आहे. काही लोका आपण किती निरोगी आहोत, मला अजिबातच थंडी लागत नाही, हे दाखवण्यासाठी गरम कपडे घालत नाहीत. परंतु, असे करणे चुकीचे असून थंडीच्या दिवसात गरम कपडे घातलेच पाहिजे. अन्यथा थंडीचे दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. तसेच तुम्ही गुलाबी थंडीचा आनंदसुद्धा घेऊ शकणार नाही.
हे लक्षात ठेवा
१ थंडी कमी असली, कमी वाटत असली तरी गरम कपडे घाला.
२ कान, डोके, पाय, शरीर योग्य पद्धतीने झाकून घ्या.
३ गरम कपडे न घातल्यास शरीराला आवश्यक असणारी उष्णता विनाकारण वाया जाते.
४ त्वचा कोरडी पडते. तिच्याकडे लक्ष द्या. अन्यथा नुकसान होऊ शकते.
Visit : arogyanama.com